Chinchwad : स्वामी समर्थ प्रकटदिनी खासदार बारणे यांनी साधला स्वामीभक्तांशी संवाद

एमपीसी न्यूज- अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त ( Chinchwad) मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-आरपीआय-रासप-मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी चिंचवड व लोणावळा येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात जाऊन दर्शन घेतले व स्वामी भक्तांशी संवाद साधला.

सकाळी चिंचवडगाव येथील अरुण मारुती जमखंडी यांच्या निवासस्थानी स्वामी समर्थ जयंती कार्यक्रमास खासदार बारणे यांनी हजेरी लावली. त्यानंतर बकाऊ वुल्फ कॉलनी येथे श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाच्या मंदिरात जाऊन बारणे यांनी स्वामींचे दर्शन घेतले. मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे पाटील, उपाध्यक्ष दीपक टावरे, कार्यकारणी सदस्य शंकर बुचडे यांनी खासदार बारणे यांचे स्वागत व सत्कार केला.

Pimpri : बेघर नवोदीत मतदार यंदा प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क, बेघर नवोदीत मतदारांना मतदान कार्ड वाटप

अखिल भारतीय श्री स्वामी गुरुपीठ (त्र्यंबकेश्वर) श्री संलग्न असणाऱ्या थेरगाव येथील श्री समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रास (दिंडोरी प्रणित) भेट देऊन खासदार बारणे यांनी स्वामी भक्तांशी संवाद साधला. संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सतीश मोटे यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.लोणावळा भंगारवाडी येथे शंकर बंद प्रतिष्ठानच्या ब्रम्हांडनायक प्रकट दिन सोहळ्यास खासदार बारणे यांनी उपस्थिती लावली.

त्यावेळी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक व सल्लागार श्रीधर पुजारी, नंदकुमार वर्तक, अरुण जोशी, आनंद जोशी, वसुधाताई पाटील, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोहर उर्फ राजू दादा निकम, आनंदा टेमघरे, सुनील दळवी, प्रभाकर भालेकर, जान्हवी कसबेकर आदींनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.भांगरवाडी येथील श्री स्वामी समर्थ शंकर चिले सेवा परिवार येथील प्रकट दिन सोहळ्यास भेट देऊन खासदार बारणे यांनी स्वामी ( Chinchwad) समर्थांचे दर्शन घेतले.‌

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.