Nagpur : अजून लोकांसमोर विकासाची पूर्ण थाळी येणं बाकी आहे – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांची नितीन गडकरी आणि राजू पारवे यांच्या प्रचारानिमित्त नागपुरात सभा

एमपीसी न्यूज : कॉंग्रेसने आतापर्यंत ओबीसी, एससी आणि एसटी  लोकांकडे दुर्लक्ष केलं, पण गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे करून त्यांच्या भवितव्यासाठी नवीन मार्ग सुकर केला आहे असे पंतप्रधान मोदी (Nagpur) म्हणाले. ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी आणि राजू पारवे यांच्या प्रचारासाठी नागपुरात आले होते.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आजकाल सगळीकडे संविधान धोक्यात आले आहे, हुकुमशाहीचा उगम होत असून लोकशाही लयास जात आहे असे विरोधी पक्ष नेते प्रत्येक सभेत ओरडून सांगत आहेत परंतू हे सर्व खोटे आहे.  जेव्हा देशातील जनतेवर आणीबाणी लादली गेली तेव्हा लोकशाही धोक्यात आली नव्हती का? जेव्हा एक गरिबाचा मुलगा पंतप्रधान झाला तेव्हा लोकशाही धोक्यात आली का? इंडी आघाडीला वंचित, गरीब आणि दुर्बल घटकातील लोकांनी केलेला विकास चालत नाही.

आम्ही कलम 370 हटवून दाखविले, २५ कोटी जनतेला गरिबीच्या छायेतून बाहेर आणलं,एक देश एक संविधान लागू केले. मी तुम्हाला आवाहन करतो की आपल्याला  पुढील हजार वर्षाचा भारताचा पाया मजबूत करायचा आहे. गेल्या १० वर्षात आपण जेवढे काम केले हे तर फक्त स्टार्टर होते. अजून लोकांसमोर जेवणाची पूर्ण थाळी येणे बाकी आहे. सध्या सगळीकडे मोदीला  शिव्या  पडतात म्हणजेच फिर एक बार मोदी सरकार येणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी  (Nagpur) व्यक्त केला.

Pune : मनसेच्या पाठिंब्यामुळे मोठ्या मताधिक्याने जिंकू –  मुरलीधर मोहोळ 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकारण कॉंग्रेसने संपविले, त्यांना भारतरत्न दिला नाही. आमच्या सरकारने एका दलित आणि आदिवासीला राष्ट्रपती बनविले.आमच्या सरकारने ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रालय स्थापित केले. अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा विरोधकांनी निमंत्रण असतानाही कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. त्यांनी निमंत्रणही नाकारले. मला तुम्हाला सांगायला गर्व वाटत आहे की आपले प्रभू श्रीराम ५०० वर्षानंतर स्वगृही परतले आहेत म्हणून ह्यावर्षीच्या रामनवमीला आपले रामलल्ला झोपडीतून नाही तर एका भव्य मंदिरातून दर्शन देणार आहेत.

माझे तुम्हाला एकच आवाहन आहे की, तुम्ही सर्व एकसंघ होऊन मतदान करा.हे इंडी आघाडीवाले देश तोडण्यासाठी काहीही करायला बसले आहेत. म्हणून तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतदानाने विजयी करून आपण एका नवीन भारताचा मजबूत पाया रचूया.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.