Pune :भावडी येथील इंद्रायणी काठी अनेक मृत मासे आढळले

जिल्हा प्रशासनाने जलपर्णी काढावी तसेच नदी स्वच्छ व निर्मळ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत - विठ्ठल शिंदे यांचे आवाहन

एमपीसी :  तुळापूर (Pune) येथून जवळील असलेल्या भावडी येथील इंद्रायणी नदीच्या काठी आज (दि. 10) रोजी अनेक मृत मासे आढळून आले. मृत पावलेल्या माशांमुळे तेथील परिसरात दुर्गंधी पसरली आहे.दूषित पाण्यामुळे तसेच येथील जलपर्णीमुळे हे मासे मृत पावल्याचे स्थानिक मासेमारी करणाऱ्यांनी सांगितले.

इंद्रायणी नदीकाठच्या गावातील  मैलमिश्रित सांडपाणी तसेच कारखान्यातील रसायनयुक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते सांडपाणी इंद्रायणी नदी(Pune) पात्रात सोडले जाते. त्या प्रदूषित पाण्यावर जलपर्णी वाढ होते.नदीपात्रातील जलपर्णी वाढीमुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह मंदावतो.हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळण्याचे प्रमाण ही कमी होत असते. यामुळे नदी पात्रातील जलचरांना धोका निर्माण होतो.

‘इंद्रायणी सेवा फाउंडेशन’चे अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.या घटनेचा त्यांनी निषेध व्यक्त केला.जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी कले आहे.प्राणवायू न भेटल्याने माशांची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.नदी स्वच्छ व निर्मळ ठेवावी.येथील नदीपात्राला जलपर्णीपासून मुक्तता मिळावी व अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाय योजना करावी असे मत यावेळी विठ्ठल शिंदे यांनी  मांडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.