Talegaon Dabhade : शकुंतला मराठे यांचे निधन

एमपीसी न्यूज – वराळे येथील शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रदायातील (Talegaon Dabhade) आदर्श माता शकुंतला (ताई) आण्णासाहेब मराठे (वय 62) यांचे रविवारी (दि.24)अल्पशा आजाराने निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर रविवारी वराळे येथील इंद्रायणी नदी तीरावरील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे,महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्ती शेटे, गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम आदींनी श्रद्धांजली समर्पित केली. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवाजी असवले, दीपक हुलावळेसह यावेळी सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक, कृषी, व्यापार व अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Dhulivandan : कोरड्या रंगांना पसंती देत शहरात धुळवड साजरी

त्यांच्या पश्चात पती, चार मुले, दीर, सूना,नातवंडे असा परिवार आहे. शकुंतला मराठे ह्या (Talegaon Dabhade) माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व तळेगाव न.प.शिक्षण मंडळाचे माजी सभापती नारायण भेगडे यांच्या भगिनी तर मावळचे माजी सभापती धोंडिबा मराठे यांची भावजय तसेच मावळ तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष व माजी जि.प.सदस्य नितीन मराठे यांच्या मातोश्री आणि प्रसिध्द गाडा मालक आण्णासाहेब मराठे यांच्या पत्नी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.