Dhulivandan : कोरड्या रंगांना पसंती देत शहरात धुळवड साजरी

एमपीसी न्यूज – उन्हाच्या झळा वाढत (Dhulivandan) असल्याने पाण्याची कमतरता सर्वच भागांमध्ये जाणवत आहे. त्यामुळे यंदा धुळवडीला अनेकांनी कोरड्या रंगांना पसंती दिली. तसेच केमिकलयुक्त रंगांना बगल देत नैसर्गिक रंगांची उधळण केली.

होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीला देशभर रंगांची उधळण केली जाते. सोमवारी (दि. 25) सकाळपासून बच्चे कंपनी मित्रांसह घर, सोसायट्यांच्या अंगणात रंग खेळत होते. रासायनिक रंग शरीरात गेल्याने त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे अशा रंगांच्या वापरावर बंदी घातली जात आहे.

Chikhali : धंदा करायचा असेल तर हप्ता दे म्हणत परिसरात दहशत पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखल

होलिका दहन केल्यानंतर उरलेली राख एकत्र केली जाते. या राखेने दुसऱ्या दिवशी सकाळी धुळवड खेळली जाते. या राखेमध्ये मातीही समाविष्ट झालेली असते. एकमेकांना अंगावर राख लावून धुळवड हा सण साजरा केला जातो. कोकणात (Dhulivandan) गावी आजही अशा प्रकारे धुळवड खेळली जाते. तर उत्तर भारतात धुळवड रंगांनी, फुलांनी साजरी केली जाते. उत्तर भारतातील प्रथा मध्य भारतात देखील रूढ होऊ लागली आहे.

महाराष्ट्रात हुताशनी पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. त्यानंतर येणाऱ्या पंचमीला रंगपंचमी साजरी केली जाते. मात्र हल्ली रंगपंचमी अगोदर पाच दिवस म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवशी रंग खेळले जात आहेत. पिंपरी चिंचवड शहरासह मावळ परिसरात आनंदाने रंगांची उधळण करत धुलीवंदन साजरे करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.