Chikhali : धंदा करायचा असेल तर हप्ता दे म्हणत परिसरात दहशत पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दुकानात जाऊन धमकी (Chikhali) देत दगडफेक करत खंडणी मागणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार शनिवारी (दि.23) साने चौक येथे घडली आहे.

याप्रकरणी शुभम नाकील (वय 26 रा. निगडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून बापू कांबळे याच्यावर गुन्हा दाखल आहे.

Mpc News : एमपीसी न्यूजचे व्यवस्थापकीय संचालक लखपतराज मेहता यांची स्वानंदबाबा आश्रमास भेट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या नेक्स्ट लेवल मोबाईल या दुकानात फिर्यादी नसताना आरोपी दुकानात आला. फिर्यादी यांच्या कामगाराला मी मर्डर करून जेल मधून बाहेर आलोय धंदा करायचा असेल तर मला (Chikhali) महिन्याला 5 हजार रुपये द्यावे लागतील म्हणत दगडफेक केली. दरम्यान फिर्यादी तेथे आले असता आरोपीने त्यांनाही जिवे मारण्याची धमकी देत परिसरात दगडफेक केली. यावरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.