Pune: होळीला नागरिकांच्या अंगावर पाण्याचे फुगे फोडणे पडले महागात, पोलिसांनी पालकांवर केले गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – होळीला फर्ग्यूसन रोडवर नागरिकांच्या अंगावर (Pune)पाण्याचे फुगे फोडून हुल्ल्डबाजी करणाऱ्या मुलांच्या पालकांवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. ही कारवाई  गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली आहे.

अल्पवयीन मुलांचे पालक रंगास्वामी मगअण्णा गौडा (वय 55, रा. हडपसर ), (Pune)धोंडीराम मच्छिंद्र आखाडे (वय 45 वर्ष, रा. कागदी पुरा कसबा पेठ ) यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार फिर्याद देण्यात आली आहे. पुढील कारवाई करण्यासाठी डेक्कन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Sharad Pawar : शरद पवार गटाची लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी आज जाहीर होणार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पादचारी नागरिकांवर दुचाकीस्वार मुलांनी फुगे फेकले होते. गुन्हे शाखा. युनिट एकचे पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे आणि शशिकांत दरेकर यांनी शिवाजीनगर आणि डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीसीटिव्ही कॅमेरे पडताळून कसबा पेठ परिसरातील दोन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक रमेश तापकीर, पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे, शशिकांत दरेकर, शुभम देसाई, महेश बामगुडे, निलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, आय्याझ दड्डिकर ,महेश सरतापे यांनी केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.