Dehuraod: राजर्षी शाहू कॉलेज ऑफ एज्युकेशन तर्फे समाजसेवा शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – जेएसपीएम पुणे संचलित राजर्षी शाहू कॉलेज ऑफ एज्युकेशन ताथवडे(Dehuraod) तर्फे समाजसेवा शिबिराचे देहूरोड येथील कार्तिक स्वामी मंदिराच्या परिसरात शुक्रवारी (दि.29) आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती प्रा. प्रविण गायकवाड यांनी दिली.

यामध्ये स्वच्छता मोहिमेअंतर्गत बी.एड.च्या शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांकडून स्वच्छता मोहिमेचे (Dehuraod)आयोजन करण्यात आले, याअंतर्गत बी.एड.च्या विद्यार्थ्यांनी कार्तिक स्वामी मंदिराच्या परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छता मोहीम राबवली. मंदिर परिसरात झालेले घाणीचे साम्राज्य, प्लास्टिक बॉटल्स, कचरा, प्लास्टिक वेसस्टन विविध खाद्यपदार्थांचे रॅपर्स,असा विविघ घण कचरा शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांनी गोळा केला. त्याचबरोबर समाज सेवा शिबिरांतर्गत दुसरा उपक्रम म्हणून मंदिर परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

 

Sharad Pawar : शरद पवार गटाची लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी आज जाहीर होणार?

सर्व शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांनी मंदिर परिसरात स्वच्छता करून सहभोजनाचे आयोजन केले.  याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भापकर सर,महाविद्यालयाचे एच.ओ.डी.डॉ. राहुल कांबळे, समाजसेवा विभाग प्रमुख प्रा. प्रविण गायकवाड, डॉ. पी.एम. वाघमारे डॉ. भदाने, प्रा. बालाजी कासले, प्रा. जयश्री धोंडे, प्रा. डॉ. निलांबिका  इंगलगी, प्रा. माधुरी गायकवाड, ग्रंथालय प्रमुख मीना आमृतकर तसेच विद्यार्थी प्रतिनिधी गणेश निसाळ आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी सहभाग नोंदवून समाज सेवा शिबिर यशस्वीरित्या संपन्न केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.