Dehuraod : विरुद्ध दिशेने जाणाऱ्या टेम्पोची दुचाकीला धडक दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज –   विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका टेम्पोने दुचाकीला ( Dehuraod ) धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 7) रात्री पावणे बारा वाजता मुकाई चौक येथे शितळानगर अंडरपास जवळ घडली. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे.

Chinchwad : क्रेडिट कार्डची माहिती घेत 33 हजारांची फसवणूक

विकास गोरख ठोंबरे (वय 42, रा. देहूरोड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. आनंद दिगंबर जाधव (वय 30, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याप्रकरणी किरण गोरख ठोंबरे (वय 34, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण यांचा मोठा भाऊ शितळानगर अंडरपास येथून त्यांच्या दुचाकीवरून जात होता. त्यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या एका टेम्पोने (एमएच 14/एचयु 9680) विकास यांच्या दुचाकीला धडक दिली.

त्यात विकास यांच्या डोक्याला, चेहऱ्याला, पायाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस ( Dehuraod ) तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.