Shirgaon : घरफोडी करून वेल्डिंग मशीन पळवली; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – घरफोडी करून वेल्डिंग मशीन आणि अन्य मशीन चोरून (Shirgaon) नेल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 7) दुपारी साडेबारा वाजता भोते वस्ती, परंडवडी येथे उघडकीस आला. याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अमित शंकर नाईक (वय 26, रा. सोमाटणे, ता. मावळ), अविनाश ज्ञानप्रकाश श्रीवास्तव (वय 35, रा. शिरगाव, ता. मावळ), साहिल रियाज शेख (वय 26, रा. सोमाटणे, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दशरथ हरिभाऊ शिंदे (वय 65, रा. चिंचवड) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून वेल्डिंग मशीन, कटिंग मशीन आणि ग्राइंडर मशीन, ड्रील मशीन, गॅस शेगडी असा एकूण 16 हजारांचा ऐवज चोरून नेला. शिरगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शिरगाव पोलीस तपास करीत (Shirgaon) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.