Nigdi : तरुणाला मारहाण करून लुटले; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – तरुणाला जबरदस्तीने गाडीवर बसवून अंधारात (Nigdi) नेले. तिथे त्याला मारहाण करून जबरदस्तीने लुटले. ही घटना सोमवारी (दि. 6) सायंकाळी सात वाजता संभाजीनगर, चिंचवड येथे घडली. याप्रकांरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

विकास रमेश पवळ (वय 26, रा. अजिंठानगर, चिंचवड), सुनील पन्नालाल आदिवाल (वय 23, रा. मोरेवस्ती, चिखली), शुभम छगन सोनवणे (वय 23, रा. अजिंठानगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विकास विजय बहादूर (वय 22, रा. तळवडे. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Shirgaon : घरफोडी करून वेल्डिंग मशीन पळवली; तिघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संभाजीनगर येथे पायी फिरत असताना दोघांनी त्यांना दुचाकीवर जबरदस्तीने बसवले. फिर्यादीस एचपी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीचा मोबाईल काढून घेतला.

आरोपींचे आणखी दोन साथीदार तिथे आले. आरोपींनी फिर्यादीच्या मोबाईल वरून ऑनलाईन माध्यमातून आठ हजार 800 रुपये  ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर आणखी पैशांची मागणी करत दांडक्याने मारून हाताला दुखापत केली. निगडी पोलीस तपास करीत (Nigdi) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.