Akurdi :  शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कोणावरही अन्याय होणार नाही – श्रीरंग बारणे

250 कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश; उपजिल्हाप्रमुखपदी बशीर सुतार

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य (Akurdi ) सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. दिवाळीपूर्वी नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप केले जात आहे. महिला बचत गटांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. पक्षात आलेल्या प्रत्येकाला न्याय दिला जाईल. कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना व युवासेना महिला आघाडीच्या  सर्व पदाधिकारी यांची आढावा बैठक खासदार बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आकुर्डीत बुधवारी झालेल्या बैठकीत 250 जणांनी खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.

150 महिलांसह विविध पदाधिकारी यांना पद वाटप करण्यात आले. जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा प्रमुख बशीर सुतार, उपजिल्हा प्रमुख मावळ शरद  हुलावळे, शहर प्रमुख निलेश तरस, महिला जिल्हा संघटिका शैला पाचपुते, पिंपरी-चिंचवडच्या शहर संघटिका  सरिता अरुण साने,  चिंचवड विधानसभा महिला संघटिका शारदा वाघमोडे, पिंपरी विधानसभा महिला संघटिका शैला निकम, युवासेना पुणे जिल्हाध्यक्ष विश्वजित बारणे, माजी नगरसेविका विमल जगताप, देहूगाव शहरप्रमुख सुनील हगवणे आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वार राज्यातील जनतेचा कार्यकर्त्यांच्या मोठा विश्वास आहे. त्यामुळेच विविध पक्षातील  लोक शिवसेनेत येत आहे. शहरात शिवसेनेची ताकद वाढत आहे. आमच्यावर विश्वास ठेवून कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत येत आहेत.

पक्षात आलेल्या कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांना न्याय दिला जाईल. पक्ष संघटना वाढविण्यासाठी कामाला लागा. संघटन मजबूत करायचे आहे. शिवसेना-भाजपचे संघटन वाढीचे काम उत्तमप्रकारे सुरू आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने दोन्ही पक्षाचे नियोजनबद्ध काम सुरू आहे. याचा निवडणुकीत मोठा फायदा होईल. राज्य सरकार जनहीताचे विविध निर्णय घेत आहे. सरकारच्या योजनेचा लाभ तळागाळातील जनतेला मिळवून द्यावा, असे आवाहनही खासदार बारणे यांनी केले.

उपजिल्हाप्रमुखपदी बशीर सुतार, चिंचवड विधानसभा प्रमुखपदी संतोष बारणे

शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी बशीर सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, चिंचवड विधानसभा प्रमुखपदी संतोष  बारणे, पिंपरी विधानसभा प्रमुखपदी निखिल येवले,पिंपरी विधानसभा महिला संघटिकापदी  शैला निकम, चिंचवड विधानसभा संघटिकापदी शारदा वाघमोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा उपप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखा प्रमुख, विभाग संघटिका, शाखा संघटिका, विभाग समनव्यक अशा विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

पिंपरी विधानसभेतील पदाधिकारी

पिंपरी  विधानसभा प्रमुख, निखील येवले, विधानसभा उपप्रमुख  मयूर सकपाळ, पिंपरी विधानसभा संघटक: नारायण लांडगे, रोशन जगताप, पिंपरी  शहर संघटक रुपेश कदम, पिंपरी विधानसभा  विभाग प्रमुख फारूक शेख, पिंपरी विधानसभा उपविभाग प्रमुख मधुसूदन अंबूस्कर, अंकुश पात्रे, सचिन निमट, सुजित बाळासाहेब सुपेकर, मुबीन मनियार, पिंपरी विधानसभा  शाखा प्रमुख मोहित भिसे, लक्ष्मण माणकेश्वर, संतोष घाडगे, अनिल साळुंखे, सुधीर धानोरकर, विक्रम जानगुडे, सचिन वाळूंज, तेजस पोखरणा, अजय डुंबरे, संदेश माने,कमल चांदवाणी

पिंपरी महिला विधानसभा संघटिका शैला निकम, पिंपरी महिला विधानसभा उपशहर संघटिका संगीता विजय कदम, रोहिणी नवले, पिंपरी महिला विधानसभा उपसंघटिका पूनम बोराड,पिंपरी महिला विभाग संघटिका नुरजहा फिरोज शेख, भारती मोहिते , आशा बालाजी गायकवाड, शोभा शंकर कसबे, शाहीन सय्यद पटेल, आरती संतोष जगताप, साधना किनसारा, सुजाता काटे, सुरेखा हिरालाल वारडे, अश्विनी दत्तू बागुल सुनिता चंद्रकांत भंगाळे, रश्मी प्रकाश भल्ला, दिपाली सूर्यवंशी, वर्षा एस पाडाळे, शुभांगी पाडाळे, दीप्ती सानविलकर, रंजना महेश जाधव

पिंपरी महिला विभाग उपसंघटिका पल्लवी डुकरे, प्रिया राहुल ठोंड, संगीता झाडे, कविता संजय नागरकोळे, नम्रता तानाजी गायकवाड, सुनिता आनंद कांबळे, चित्रा गालफाडे,जया राम क्षीरसागर, रेश्मा राजेश कांबळे, सुप्रिया अजित कुटे, प्रिया पॅटी, जयश्री चिकणे, श्रद्धा कापडी, शोभा बंगाळे, सुनंदा कलबुर्गी, अपर्णा आगाशे, पुष्पा विनायक चव्हाण, रंजना अमृत सोनावणे, मंगल गजानन कोळसुरे

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी

चिंचवड विधानसभा प्रमुख संतोष गुलाब बारणे,चिंचवड विधानसभा विभाग प्रमुख अंबादास लोखंडे,नितीश कान्हेरे, गणेश खानेकर,दीपक कोठावडे, कानिफनाथ तोडकर,योगेश गोडांबे, संकेत पाटील, ऋषिकेश जाधव, मनोज राजमाने, रमेश विश्वकर्मा, महेश पाटील, रितेश उत्तरवर,बापू शहाजी तांबे, आकाश दत्तात्रेय बारणे, विशाल दहापुते, सागर फितवे,मयूर अनिल भवसार, स्वप्नील थेपडे, हितेश (Akurdi )उपाध्याय

चिंचवड विधानसभा उपविभाग प्रमुख: अरुण धोंडीबा गोंटे, नंदू घुले, अनिकेत कल्याणकर, प्रवीण भोकरे, पाशाखान पठाण , राकेश जगताप अमित गाडे, सुमित बुऱ्हाडे,शाम केदारी, रामभाऊ जामखंडी, संदेश आवळे, गौरव केरकर, सतीश मोरे, ज्ञानेश्वर सगर, सौरभ गुंजाळ, अभिजीत कांबळे,दर्शन वेगंनकर, हनुमंत महादेव थोरात, राहुल भरत काळे, रेवण राजेंद्र जगताप

चिंचवड विधानसभा शाखा प्रमुख: राकेश मांढरे, ऋषिकेश ताते, सागर हगवणे, आकाश जमदाडे, शेखर देवरे, शुभम बोरकर, रणधीर शिंदे, सुनील तायडे, नितीन घाडगे, प्रसाद सुडके ,अतुल पोगडे, मयूर नवले ,रोहन शेटे, सचिन वामन, कासीम मणियार, राजेंद्र यादव, जाकिर मणियार, अलिम अत्तार, अनिल पाटील, प्रदीप शिरसाठ,प्रदीप मोरे, दिलीप अण्णप्पा अनिवाल, सचिन मधुकर कसबे,सोमनाथ विश्वनाथ चनशेट्टी, सुनील विजय पाटील, स्वप्नील पट्टेवार, वैभव चौधरी, विजयकुमार भोले

चिंचवड विधानसभा  उपशाखा प्रमुख: युनुस मणियार, शुभम कोळेकर, ओंकार यादव, महेश फाळके, रामदास फुलवडे, प्रणय भालसैन, विजय विलास आवारे, विजय विश्वनाथ धावारे चिंचवड विधानसभा महिला उपसंघटिका :  साधना नामदेव वांजळे
चिंचवड विधानसभा महिला विभाग संघटिका: हेमलता ढोरजे, माधुरी ठाकरे, जानवी भाळे, तराणा सय्यद, जया संजय थोरात, आशा रॉय, सुनिता साळवे, सुनिता सातपुते, वर्षा शिवाजी नेटके, साधना तरस

चिंचवड विधानसभा महिला उपविभाग संघटिका: मोनाली कांबळे, तारामती श्रीखंडे, नीता खंडागळे, स्वाती उभे, उषा बनसोडे, वैशाली गोरे, शोभा प्रकाश खंडाळे, छाया बलराज गायकवाड, अंजनाताई आनंद कांबळे, छाया निखिल कांबळे, चंद्रकला नावडे,चिंचवड विधानसभा महिला शाखा प्रमुख: लता नवरत्ने, सुरेखा राजेंद्र चौधरी,

चिंचवड विधानसभा महिला उपशाखा संघटिका सुनिता यादव, गीता राठोड, सुजाता सावंत, अश्विनी सरडे, आरती कदम, प्रियांका गायकवाड, संगीता भेगडे, कल्पना गरुड, चिंचवड विधानसभा महिला शाखा संघटिका: सविता गरुड, नंदा पिंजण, सुष्मा कृष्णा भेगडे, जयमाला नेटके, अंजली रॉय, रेखा संजय कांबळे, सविता देविदास वर्पे, आशा भोसले, हीना आचार्य, अशा हेमंत कदम, वनिता सतीश गायकवाड, (Akurdi ) अमृता देधे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.