Baner: बाणेर येथे घरफोडी करणाऱ्याला मुंबईतून अटक, चतु:शृंगी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – बाणेर येथील सकाळनगर भागात भरदिवसा (Baner)घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना चतु:शृंगी पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे.

महम्मद रईस अब्दुल आहद शेख (वय 37, रा. मालवणी, मुंबई) आणि महम्मद रिझवान हनीफ शेख (वय 33, रा जोगेश्वरी पूर्व, मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर रस्त्यावरील सकाळनगर भागात 23 फेब्रुवारी(Baner) रोजी भरदिवसा दोन घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले होते.त्यानुसार चतु:शृंगी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले.

 

Dehuraod: राजर्षी शाहू कॉलेज ऑफ एज्युकेशन तर्फे समाजसेवा शिबिराचे आयोजन

तसेच, तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेतला. त्यात चोरटे मुंबई परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार नालासोपारा, पालघर आणि जोगेश्वरी येथून आरोपींना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून मुंबईतून 30 तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असा 20 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.

हि कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कुलकर्णी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) युवराज नांद्रे, सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलिस उपनिरीक्षक रूपेश चाळके यांच्या पथकाने केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.