Today’s Horoscope 11 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 11 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – गुरुवार

तारीख – 11.04.2024.

शुभाशुभ विचार – कृत्तिका वर्ज्य.

आज विशेष – गौरी तृतीया.

राहू काळ – दुपारी 01.30  ते 03.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आज नक्षत्र – कृत्तिका.

चंद्र राशी – मेष 08.40 पर्यंत नंतर वृषभ.

—————————–

मेष ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आर्थिक बाजू भक्कम असल्याने सर्व कामे सुरळीत पार पडतील. सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील.

वृषभ (शुभ रंग- सोनेरी)

खिशात पैसा खेळता असल्याने तुमची मनस्थिती उत्तम असेल तुमच्यातील सकारात्मकता इतरांना प्रभावित करेल. आज इतरांना दिलेले शब्द तुम्ही आवर्जून पाळाल.

मिथुन (शुभ रंग – तांबडा)

आज तुम्ही काहीसे लहरीपणे वागाल. घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकतील. तरुणांना आज प्रलोभने आकर्षित करतील. ज्येष्ठ मंडळी तीर्थक्षेत्री प्रवासाला निघतील.

कर्क ( शुभ रंग- हिरवा)

आज हार्ड वर्क न करता स्मार्टवर्क करण्याकडे तुमचा कल असेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल. मोठेपणा घेण्यासाठी खर्चही कराल.

सिंह ( शुभ रंग- पिस्ता)

आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी आज तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना प्रमोशनची चाहूल लागेल. आज तुम्ही व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल.

कन्या (शुभ रंग- डाळिंबी)

आज तुमच्या प्रयत्नांना दैवाची साथ 100% असेल. नोकरीत असाल तर साहेबांची कृपादृष्टी राहील. नास्तिक मंडळी ही आज गरजेपुरती श्रद्धाळू होतील.

तूळ (शुभ रंग- चंदेरी)

जे चाललंय ते चांगलंच म्हणायला हवं. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह धरू नका. धाडसाची कामे आज टाळली तर बरे. आज सासुरवाडी कडून एखादा लाभ होऊ शकतो.

वृश्चिक ( शुभ रंग- क्रीम)

वैवाहिक जीवनात सुसंवाद असेल. जोडीदाराला दिलेले शब्द पाळाल. व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. आज तुम्ही उगीचच इतरांच्या भानगडीत लक्ष घालाल.

धनु (शुभ रंग- निळा)

प्रयत्नांना नशिबाची साथ नक्की मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील.

मकर (शुभ रंग- जांभळा)

आज तुम्ही मुलांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. आपल्या कुटुंबियांना अभिमानास्पद वाटेल अशी एखादी कामगिरी कराल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

कुंभ ( शुभ रंग- आकाशी)

तुमच्या सामाजिक प्रतिश्ठेत वाढ होईल. आज घरात सज्जनांची उठबस राहील. गृहिणी स्वतःचे छंद जपतील. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. गृह सौख्याचा दिवस.

मीन (शुभ रंग- राखाडी)

एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आज भटकंती होण्याची शक्यता आहे. गृहिणी शेजार धर्म पाळतील. जवळपासच्या प्रवासात काही फायदेशीर ओळखी होतील.

शुभम भवतु
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.