Pune : मनसेच्या पाठिंब्यामुळे मोठ्या मताधिक्याने जिंकू –  मुरलीधर मोहोळ 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी ( Pune ) महायुतीला शिवतीर्थावरुन दिलेला बिनशर्त पाठिंबा, हा त्यांच्या देशाच्या विकासाबद्दल असलेला सच्चेपणा अधोरेखित करतो. हिंदू नववर्षाच्या शुभदिनी केलेल्या या घोषणेमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांना निश्तितच बळ मिळाले आहे. पुणे लोकसभा निडणुकीतही मनसैनिकांना सोबत घेऊन आम्ही एकदिलाने या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि मोठ्या मताधिक्याने जिंकू, हा विश्वास वाटतो, अशी प्रतिक्रिया पुणे लोकसभा माहायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 

 

Mahalunge : वाहनांचे रबरी पार्ट चोरणाऱ्यास अटक

 

दरम्यान, पुण्यात मोहोळ यांना मनसेने पाठिंबा दिल्याने त्यांच्या मताधिक्यात वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे, मुंबई, नाशिक जिल्ह्यात मनसेची मोठी ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी हा पाठिंबा दिल्याची चर्चा आहे.

यापूर्वी 2019 मध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’, म्हणून राज ठाकरे यांनी मोदींवर टीका केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर राज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर ( Pune ) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.