Wakad : वाकडमध्ये स्पा सेंटरवर सलग दुसरी कारवाई , स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय

'द रीज स्पा मसाज सेंटर' मध्ये सुरु होता वेश्या व्यवसाय

एमपीसी न्यूज – स्पा सेंटर मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोन आस्थापनांवर पिंपरी-चिंचवड अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागोपाठ दोन कारवाया झाल्या आहेत. स्पा सेंटर चालक, मालक आणि व्यवस्थापक काही महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय (Wakad) करून घेतल्याचे कारवायांमधून उघडकीस आले आहे.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेस्टिंग स्क्वेअर मॉलमधील द रीज स्पा (Wakad) या मसाज पार्लर मध्ये काही दलाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या  मुलींना स्पाचे नावाखाली जास्त पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडतात अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (दि. 8) स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई करत स्पा व्यवस्थापक उमेश उर्फ अनिकेत इंद्रजीत दुबे (रा. बाणेर गाव, पुणे. मूळ रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली.

Wakad : स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

उमेश दुबे आणि स्पा सेंटरची मालक महिला यांनी तीन महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी भाग पाडले होते. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, मारुती करचुंडे, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी पिंपळे सौदागर मध्ये कारवाई

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारची कारवाई झाली होती. पिंपळे सौदागर येथील स्पॉट 18 मॉलमधील स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाने पर्दाफाश केला. मसाजच्या नावाखाली तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. यातून दोन तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.