Pune : प्रदीप कुरुलकर विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी; एटीएस कार्यालयाबाहेर काँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज : डीआरडीओचे तत्कालिन (Pune) संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या ठपका ठेवत राज्य दहशतवाद विरोधी पथकाने विशेष न्यायालयात 1 हजार 835 पानांचे दोषारोपपत्र विशेष न्यायालयात शुक्रवारी दाखल केले. त्या दोषारोपपत्रामध्ये प्रदीप कुरुलकर विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्याच्या निषेधार्थ आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी आज पुणे एटीएस कार्यालयाबाहेर पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी,आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, डीआरडीओचे संचालक वरिष्ठ प्रदीप कुरुलकर यांनी आपल्या देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला पुरविली आहे.

प्रदीप कुरुलकर या व्यक्तीने देशासोबत गद्दारी केली असून त्याच्या विरोधात एटीएसकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल अशी अपेक्षा होती. एवढा मोठा गुन्हा करून देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल का झाला नाही. हा प्रश्न आमच्या सह सर्व सामान्य नागरिकाच्या मनात आहे.

Punawale : खूनाची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला जिवे मारण्याची धमकी

त्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी पुणे एटीएस कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहे. या मागणीची दखल एटीएस घेऊन तात्काळ (Pune) देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा आम्ही या विरोधात जन आंदोलन उभारण्याचा देखील यावेळी त्यांनी इशारा दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.