Talegaon Dabhade : माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरमध्ये समर्थ रामदास नवमी साजरी

एमपीसी न्यूज – ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर या शाळेच्या (Talegaon Dabhade ) अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरमध्ये समर्थ रामदास नवमी अध्यात्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. समर्थ रामदास स्वामी यांच्या आदर्श विचारांची यावेळी सर्वांच्या मनात पेरणी करण्यात आली.

ॲड. पु.वा. परांजपे विद्या मंदिरा मध्ये समर्थ रामदास नवमी कार्यक्रम अध्यात्मिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास शाळेच्या माजी विद्यार्थिनी आदर्श शिक्षिका उर्मिला बासरकर,कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या सचिव गौरी काकडे,प्राध्यापिका भाग्यश्री शिंदे, अकाउंटंट आरिफा शिकीलकर निशा ढमढेरे,अश्विनी भेगडे,अर्चना थिटे उपस्थित होत्या.विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे,पर्यवेक्षक  पांडुरंग कापरे,जेष्ठ अध्यापक शरद जांभळे व कार्यक्रमास उपस्थित माजी विद्यार्थिनी यांच्या हस्ते समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने मोगऱ्याचे रोप देऊन माजी विद्यार्थिनींचे सत्कार करण्यात आले.

Talegaon Dabhade : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे ज्योतिर्लिंग, कैलास पर्वतावरील शंकराचे चैतन्यदर्शन

इयत्ता नववी अ मधील कु गायत्री ठोसर व इयत्ता आठवी क मधील स्नेहा मलकटे या विद्यार्थिनींनी रामदास स्वामी यांच्या बद्दल माहिती सांगितली. मानवी मनाला सुसंस्कृत करणारे मनाचे श्लोक विद्यार्थ्यांनी म्हटले. ज्येष्ठ माजी विद्यार्थिनी आदर्श शिक्षिका उर्मिला बासरकर यांनी रामदास स्वामीचा संपूर्ण जीवनपट समर्पक शब्दात सांगितला.

गौरी काकडे यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. आजच्या काळात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. शासनाने विद्यार्थ्यांसाठी विविध उपाय योजना राबवलेल्या आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा असे आपल्या मनोगतात सांगितले.

शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे सर यांनी विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबवण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती सांगितली. अमृत महोत्सवी वर्ष कशाप्रकारे साजरे केले जाणार आहे त्याचाही थोडक्यात आढावा सांगितला.

कार्यक्रमास नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी ब मधील कु रिया भोकरे या विद्यार्थिनीने केले या कार्यक्रमाचे नियोजन वर्गशिक्षक जांभळे सर यांच्या मार्गदर्शनातून इ.9वी विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.