Dapodi : कपाटाचे लॉक तोडून तीन तोळे सोने पळविले

एमपीसी न्यूज – घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी 32 ग्रॅम वजनाचे 66 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 2) दुपारी चारच्या सुमारास दापोडी येथे उघडकीस आली.

दत्तात्रय माणिकराव गायकवाड (वय 57, रा. गणेश रेसिडन्सी, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेचार ते शनिवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान गायकवाड यांचे घर कुलूप लावून बंद होते.

दरम्यान, चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यातील 32 ग्रॅम वजनाचे 66 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश खारगे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.