Dighi :प्लॅस्टिकच्या पोत्यात ठेवलेले पैसे चोरले

एमपीसी न्यूज – दरवाजाची कडी उघडून चोरट्यांनी बेडरूम मध्ये प्लॅस्टिकच्या पोत्यात ठेवलेले पैसे चोरून नेले. ही घटना दिघी येथे शुक्रवारी (दि. 1) रात्री नऊच्या सुमारास घडली.

प्रशांत बबन राऊत (वय 37, रा. बालाजी कॉम्प्लेक्स, चौधरी पार्क, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राऊत यांचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायानिमित्त ते शुक्रवारी रात्री बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची दोन मुले घरी होती. रात्री नऊ ते साडेनऊ वाजताच्या दरम्यान दरवाजाला कडी लावून मुले दळणाकरिता बाहेर गेली होती.

दरम्यान, चोरट्यांनी घराच्या बेडरूममधील प्लॅस्टिकच्या पोत्यात ठेवलेले 53 हजार रुपये कोणीतरी चोरून नेले. घरी आल्यावर त्यांना दरवाजाची कडी कोणीतरी उघडल्याचे दिसून आले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.