Nigdi : स्कोडा मोटारीतून आलेल्या चौघांनी दुचाकीस्वाराला लुटले

एमपीसी न्यूज – स्कोडा मोटारीतून आलेल्या चार चोरट्यांनी मारहाण करून दुचाकीस्वाराच्या खिशातील पैसे चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 2) सायंकाळी सातच्या सुमारास आकुर्डीमधील बस स्टॉप येथे घडली.

ज्ञानदेव भानुदास तरंगे (वय 43, रा. रॉयल कासा सोसायटी, डी. वाय. पाटील रोड, रावेत) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्कोडा मोटारीतील चार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी तरंगे हे आपल्या दुचाकीवरून जात होते. ते आकुर्डी येथील गणेश व्हिजन समोरील बस स्टॉपजवळ आले असता त्यांच्या दुचाकीस स्कोडा कारने (एमएच 14 / एव्ही 4646) पाठीमागून धडक दिली. त्यानंतर दुचाकीला पुढे आडवी मोटार घालून दुचाकीस्वारास थांबण्यास भाग पाडले.

त्यानंतर फिर्यादी तरंगे यांना शिवीगाळ आणि हाताने मारहाण करून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील अकरा हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनावणे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.