Bhagirathi Nala: भागीरथी नाल्याच्या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य तर भराव रस्त्यावरील स्पॉट लाईट दिवे बंद अवस्थेत

एमपीसी न्यूज : आळंदी येथील माऊली मंदिरा जवळपास असणाऱ्या अंतरावरच, काही भागातील, गल्ली बोळातील पथदिवे बंद असल्याने तसेच तिथे विद्युत प्रकाश व्यवस्था पुरेशी नसल्याने तिथे रात्रीचे अंधाराचे साम्राज्य दिसून येत आहे. भोई समाज धर्मशाळेसमोरील पालिकेचे स्वच्छतागृहाकडे जाणाऱ्या मार्गावरील एल इ डी दिवा बंद अवस्थेत आहे.व स्वच्छतागृहावरील समोरील दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी पूर्ण पणे हा भाग अंधारातच असतो.

स्वच्छतागृहाच्या परिसरात अंधार असल्याने रात्रीच्या वेळी त्याची सुविधा नागरिकांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे.तेथील वीज पुरवठा असलेला लोखंडी खांब ते झुणका भाकर केंद्र या आतील मार्गाच्या रस्त्यावर पुरेसे विद्युत दिवे नसल्याने या परिसरात अंधार दिसून येत आहे. तसेच भागीरथी(कुंड) नाला रस्त्यावर कायम स्वरूपी पथदिवे नसल्याने हा परिसर नेहमीच अंधारात दिसून येतो.येथील मे महिन्यात जलतीर्थ भागीरथी कुंडाचे पुनरुज्जीवनाचे काम सेवा भावी संस्था, व्यक्ती आणि आळंदी नगर परिषदेच्या माध्यमातून काम करण्यात आले होते.

Pankaj Bhalekar : देहू आळंदी बीआरटी रस्ता व निगडी तळवडे रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन : पंकज भालेकर

आषाढी वारी व कार्तिकी यात्रेच्या दिवसांमध्ये या परिसरात मरक्युरी लाईट लावून तात्पुरता विद्युत प्रकाश पुरवठा केला जातो.येथे कायम स्वरूपी पथदिव्यांची सोय करणे गरजेचे आहे.येथील काही नागरिकांनी अनेक वेळा पालिका प्रशासनास येथे कायम स्वरूपी एल इ डी पथदिव्यांची सोय व्हावी म्हणून मागणी केली होती.ती पूर्ण झालेली दिसून येत नाही.माऊलींच्या दर्शनासाठी अथवा इतर कामानिमित्त या रस्त्यावरुन नेहमीच रात्रीच्या वेळी अनेक नागरिक ये जा करत असतात. तर भराव रस्त्यावर असणाऱ्या स्पॉट लाइट्स बरेच महिने बंद अवस्थेत दिसत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.