Pankaj Bhalekar : देहू आळंदी बीआरटी रस्ता व निगडी तळवडे रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन : पंकज भालेकर

एमपीसी न्यूज : देहू आळंदी बीआरटी रस्ता व निगडी तळवडे रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा पिंपरी चिंचवड  महापालिके विरोधात नागरिक आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी दिला आहे.(Pankaj Bhalekar) याबाबतचे निवेदन त्यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यालयात दिले आहे.

निवेदनात भालेकर म्हणतात की, भिवंडी रस्ता पिंपरी चिंचवड शहरातील देहू व आळंदी या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणारा एकमेव रस्ता आहे. (Pankaj Bhalekar) या रस्त्याचा वापर पिंपरी चिंचवड शहराच्या उत्तरे कडील बाह्य वाहतुकीस होत असून औद्योगिक वाहतूक मुख्यत्वे याच रस्त्याने होत असल्याने दळणवळणाकरिता हा मुख्य रस्ता आहे. तथापी या रस्त्यावर पिंपरी-चिंचवड महामार्फत 1200 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आली असून रस्ता अद्याप पूर्ववत झालेला नाही. तसेच या रस्त्यावर केबल टाकण्याकरिता सुद्धा त्याच रस्त्याची खोदाई करण्यात आली असल्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. त्यामुळे देहू आळंदी रस्त्याची वाहतूक संथ झाली असून अपघातांचे प्रमाणात वाढ झालेली आहे.

IND vs Bangladesh : बांगलादेशला पाच धावांनी पराभूत करत भारताने मिळवला चित्तथरारक विजय

स्थानिक नागरिक व कामगार यांना रस्त्याने प्रवास करताना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या बीआरटी व पाणीपुरवठा विभागाकडे याकरिता वारंवार पाठपुरावा करण्यात येत असून याबाबत दोन्ही विभागामार्फत टाळाटाळ होत असल्याने असल्याचे दिसून येत आहे.(Pankaj Bhalekar) तसेच निगडी तळवडे रस्त्याची गणेश नगर चौक व कहार माथा (मोनोपोल जवळ) येथे दुरावस्था झालेली असून त्याची देखील तात्काळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे. याबाबत मनपा मार्फत तात्काळ कार्यवाही करून दोन्ही रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा याकरिता नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.

भालेकर म्हणाले की ते आज आयुक्तांना निवेदन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यालयात गेले होते. पण आयुक्त काही कामानिमित्त बाहेर गेले असल्याने त्यांनी निवेदन आयुक्त कार्यालयात दिले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.