Pune news : कौन बानेगा करोडपतीच्या नावाने फसवणुकीची शक्यता : संदीप खर्डेकर

एमपीसी न्यूज – कौन बनेगा करोडपतीच्या नावाने फसवणुकीची शक्यता असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी म्हटले आहे.(Pune news ) यासंदर्भातील निवेदन त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहे. 

काल खर्डेकर यांच्या मोबाईलवर व्हाट्सअँपच्या माध्यमातून एक संदेश आला व यात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या टीव्ही वरील लोकप्रिय “कौन बनेगा करोडपती” ह्या शो चा उल्लेख आहे.(Pune news) त्यांच्या मोबाईल नंबर ला 25 लाख रुपयाची लॉटरी लागली असून पोस्टर वरील मोबाईल वर व्हाट्सअँप कॉल केल्यावर त्यांना  या बक्षीसाची रक्कम मिळेल असे सांगणारी एक ऑडिओ क्लिप देखील पाठवण्यात आली आहे.

Pankaj Bhalekar : देहू आळंदी बीआरटी रस्ता व निगडी तळवडे रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन : पंकज भालेकर

स्वभाविकपणे हा फसवणूकीचा नवा प्रकार असल्याचे लक्षात येते. खर्डेकर यांना अश्या कोणत्याही लॉटरीचा मोह नसल्याने त्यांनी या संदेशाकडे दुर्लक्ष केले.(Pune news) मात्र, अनेक गरजावंतांची अश्या माध्यमातून फसवणूक होऊ नये यासाठी योग्य कारवाई करावी व सामान्यांना सावध देखील करावे, अशी विनंती पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.