Sambhaji bhide guruji : संभाजी भिडे पुन्हा वादात; राज्य महिला आयोगाने पाठवली नोटीस

एमपीसी न्यूज : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे नेते संभाजी भिडे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संभाजी भिडे हे मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयात गेले होते. तिथून बाहेर पडत असताना एका महिला पत्रकार सोबत बोलताना त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. आणि यावरूनच आता राज्य महिला आयोगाने देखील संभाजी भिडे यांना नोटीस पाठवली आहे.

एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने संभाजी भिडे यांना थांबवून प्रतिक्रिया विचारले असता ते म्हणाले, आमची अशी भावना आहे की, प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे भारत माता विधवा नाही. कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो..असे विधान करून संभाजी भिडे निघून गेले. त्यांच्या या विधानावरून आता नव्याने वाद सुरू झाला आहे.

Maval : आमदार साहेब! हे वागणं बरं नव्हं आमदार सुनिल शेळके यांच्या वक्तव्यावर माजी मंत्र्यांचे उत्तर

राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांना नोटीस पाठवून आपल्या त्या भूमिकेचा तत्काळ खुलासा करण्यास सांगितले आहे. महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. आपले हे वक्तव्य स्त्री मनाला आणि सामाजिक दर्जाला तेच पोहोचवणारे आहे त्यामुळे या भूमिकेबाबत तत्काळ खुलासा करावा असे राज्य महिला आयोगाने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.