Talegaon Dabhade : घोरावडेश्वर डोंगराच्या दरीत पडून पर्यटक तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : घोरावडेश्वर डोंगराच्या दरीत पडून एका पर्यटक तरूणाचा दुर्देवी मृत्यू झाला.

लक्ष्मण जटप्पा पुजारी, वय (25) वर्षे, रा. तळेगाव दाभाडे, (Talegaon Dabhade) म्हाडा कॉलनी असे मृत तरुणाचे नाव आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्था व शिव दुर्ग मित्र लोणावळा यांच्या पथकाने 150 फुट खोल दरीतून त्याचा मृतदेह आज सायंकाळी बाहेर काढला.

याबाबत अधिक माहिती देताना, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक नीलेश गराडे, म्हणाले की, अंदाजे दोन दिवसांपूर्वी रविवारी हा तरुण त्याच्या मित्रांसोबत घोरावडेश्वर डोंगरावर पर्यटनासाठी गेला होते. संध्याकाळी डोंगरावरून खाली येत असताना त्याचे मित्र पुढे गेले व तो मागे राहिला. अंधार झाल्याने तो वाट चुकला. त्याने हें सर्व त्याच्या बहिणीला फोन करून सांगितले. पण त्यानंतर त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Pune news : ‘मकर संक्रांती- भोगी’चा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा होणार

तसेच त्यांनी घोरावडेश्वर डोंगरावर त्याचा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह त्यांना दरीत पडलेला दिसला. त्याच्या नातेवाईकांनी आज तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्था व शिवदुर्ग लोणावळा यांना कळवले. या तरुणाचा मृतदेह घोरावडेश्वर डोंगराच्या 150 फूट खोल दरीत पडलेला आहे. पोलिसांनी या संस्थांच्या पथकांना तो मृतदेह बाहेर काढण्यासाठी बोलावले. दिड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन लांडगे, सहाय्य्क पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी व त्यांचे पथक घटनास्थळी आळे होते. पुढील तपास साळी करत आहेत. महेश मसने, कुंभार, राजेंद्र कडू, अमोल सुतार, हर्ष तोंडे, अशोक उंबरे, हर्षल चौधरी, रतन सिंग, कमल परदेशी, अनिल आंद्रे, भास्कर माळी,सत्यम सांवत, विकी दौंडकर, सुनील गायकवाड नीलेश संपतराव गराडे यांच्या पथकाने मृतदेह दरीतून बाहेर काढला व नंतर ते डोंगराखाली घेऊन गेले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.