Dehugaon: ‘सुरक्षित वारी- प्लास्टिक मुक्त वारी’ अभियानाला सुरुवात

चार हजार कापडी पिशव्यांचे वाटप

एमपीसी न्यूज – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात प्राधिकरण नागरी सुरक्षा सोसायटी व जैन सोशल ग्रुप डायमंड पिंपरी-चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पुणे ग्रामीण पोलीस यांच्या सहकार्याने ‘प्लास्टिक मुक्त वारी अभियान – 2018’ ची सुरुवात देहू येथून करण्यात आली. हे अभियान 5 जुलै ते 27 जुलै 2018 दरम्यान आयोजित केले आहे. या अभियानाची सुरुवात चार हजार कापडी पिशव्या वारक-यांना वाटून करण्यात आली.

देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार, पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर, मनोज पवार, जैन सोशल ग्रुप डायमंडचे अध्यक्ष सुनील शहा, सचिव अतुल धोका, प्राधिकरण नागरी सुरक्षा सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, अर्चना घाळी यांच्या हस्ते अभियानाची सुरुवात करण्यात आली.

प्लास्टिक मुक्त वारी अभियानास विशेष परिश्रम पंकज गुगळे, साधना शहा, गीता गुगळे, मीनाक्षी मुनोत, अनुप शहा, प्रशांत गांधी ,कमलेश चोपडा, दीपक डागा, संतोष छाजेड, कामेश शहा, मनिषा जैन, संजय कासवा, संतोष चव्हाण, रेखा भोळे, विभावरी इंगळे, विशाल शेवाळे, अजय घाडी, नितीन मांडवे, अमोल कानु, जयेंद्र मकवाना, बाबासाहेब घाळी, अमित डांगे, गौरी सरोदे, मोहन भोळे यांनी घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.