Delhi : सरकार आमचे फोन हॅक करत आहे; विरोधी नेत्यांचे केंद्र सरकारवर धक्कादायक आरोप

एमपीसी न्यूज – काँग्रेस नेते (Delhi) शशी थरूर, तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार प्रियांका चतुर्वेदी, पवन खेडा यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना त्यांचे ईमेल सरकार हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा अलर्ट संदेश प्राप्त झाल्याचा दावा या विरोधी नेत्यांनी केला आहे. या अलर्टमध्ये त्यांना इशारा देण्यात आला आहे की, सरकार त्यांचे फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अल्गोरिदम मधील त्रुटीमुळे हे मेल आल्याचा दावा सरकारी सूत्रांनी केला आहे.

कॅश फॉर क्वेरी प्रकरणात अडकलेल्या टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी अॅपलकडून मिळालेल्या या अलर्टचा स्क्रीनशॉट शेअर करून सर्वप्रथम मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

महुआ यांनी सांगितले की, मला अॅपल कंपनी कडून एक अलर्ट आणि ईमेल मिळाला की सरकार माझा फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. महुआ व्यतिरिक्त काँग्रेस खासदार शशी थरूर, पवन खेडा आणि शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही त्यांच्या फोनवर अशा (Delhi) अलर्टचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

Pune : नाना पेठेत मॉर्डन बेकरी चौकात पीएमपीएमएल ब्रेकडाऊनच्या बसला आग

आप खासदार राघव चढ्ढा, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, सीपीएम सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या फोनवरही हा अलर्ट आल्याचा दावा खासदार महुआने केला आहे.

दुसरीकडे, एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही त्यांच्या फोनवर अलर्ट मिळाल्याचा दावा केला आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही ट्विट केले की, त्यांनाही अॅपलकडून अलर्ट मिळाला आहे. ते म्हणाले, माझ्यासारख्या करदात्यांच्या खर्चावर अल्परोजगार अधिकाऱ्यांना व्यस्त ठेवण्यात सरकारला आनंद होतो! सरकारकडे करण्यासारखे दुसरे काही महत्त्वाचे राहिले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.