Pune : नाना पेठेत मॉर्डन बेकरी चौकात पीएमपीएमएल ब्रेकडाऊनच्या बसला आग

एमपीसी न्यूज – नाना पेठेतील मॉडर्न बेकरी चौकात ( Pune) पीएमपीएल ब्रेकडाउन बसला आग लागली. अग्निशमन दल घटनास्थळी त्वरित दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यास मदत झाली.

अग्निशमन अधिकारी पंकज जगताप यांनी सांगितले, आज सायंकाळी 7 च्या सुमारास पीएमपीएमल ब्रेकडाउन बस दुस-या ठिकाणी जात असताना बसमध्ये बिघाड होऊन बसला अचानक ( Pune) आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अनेकदा, कूलंट, ट्रान्समिशन फ्लुइड, पॉवर स्टीयरिंग फ्लुइड आणि बरेच काही यासारख्या आवश्यक द्रवपदार्थांची गळती झाल्याने वाहनांना अचानक आग लागू शकते.

याव्यतिरिक्त, सैल ऑइल फिलर कॅपसारख्या साध्या गोष्टीमुळे इंजिनवर तेल सांडले जाऊ शकते, ज्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो. या घटनेत असाच काहीसा ( Pune) प्रकार  घडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.