Rajgurunagar : एक मूठ धान्य उपक्रमांतर्गत वनवासी विद्यार्थी वसतीगृहास धान्य आणि धनादेश सुपूर्त

एमपीसी न्यूज –  स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभागातर्फे राजगुरूनगर (Rajgurunagar) येथील विश्व हिंदू परिषद संचलित वनवासी विद्यार्थी वसतिगृहास एक मूठ धान्य उपक्रमाअंतर्गत जमा झालेले धान्य ज्वारी, गहू, तांदूळ, मूग डाळ, शेंगदाणे आणि तेल देण्यात आले.

Raymond offer : स्वातंत्र्य दिनानिमित्त निगडीच्या रेमंड शोरूममध्ये पॅन्टवर खास ऑफर

विभागाच्या कार्याध्यक्ष अश्विनी अनंतपुरे, सहकार्याध्यक्ष वैदेही पटवर्धन, अध्यक्ष नेहा साठे, सचिव हर्षदा पोरे, कोषाध्यक्ष स्वाती जोशी, सदस्य शितल गोखले, राधिका सुखटणकर, उज्ज्वला जाधव यांनी वसतिगृहास भेट देऊन हा उपक्रम राबविला. तसेच दान पात्र योजने अंतर्गत जमा झालेल्या रकमेचा धनादेश दिलीप देशपांडे यांच्याकडे  सुपूर्त करण्यात आला.

वसतिगृहाचे पालक दिलीप देशपांडे यांनी संस्थेची माहिती करून दिली. तर विभागाच्या कार्याध्यक्ष अश्विनी अनंतपुरे यांनी राबविलेल्या उपक्रमांची माहीती सांगितली. यावेळी संस्थेचे अधिक्षक अमोल सुधाकर डमरे, सहाय्यक शिवराम काशिनाथ गवळी, उषा शिवराम गवळी उपस्थित होते. वसतिगृहातील मुलांनी ‘आम्ही डोंगरचे राहणार, चाकर शिवबाचे होणार’ हे पद्य सादर केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.