Dighi : गळफास घेऊन परिचारिकेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – परिचारिका म्हणून काम करणाऱ्या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 21) सायंकाळी पाच (Dighi) वाजताच्या सुमारास घडली.

Pimpri : महिलांना 33 टक्के आरक्षण, भाजपकडून आंनदोत्सव

प्रतिक्षा सागर भगत (वय 25, रा. सोमनाथ येवले यांच्या खोलीत, कृष्णानगर, दिघी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक्षा या परिचारिका म्हणून काम करीत होत्या. त्यांनी गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.