Pimpri : महावितरणच्या डीपी बॉक्‍सला आग

एमपीसी न्यूज – पिंपरी (Pimpri) मधील मोरवाडी येथे महावितरणच्या डीपी बॉक्‍सला आग लागली. ही घटना शुक्रवारी (दि. 22) सकाळी घडली.

Dighi : गळफास घेऊन परिचारिकेची आत्महत्या

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोरवाडी येथील महावितरणच्या डीपी बॉक्‍सला आग लागल्याची वर्दी पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाला सकाळी 8.50 वाजताच्या सुमारास मिळाली. त्यानुसार पिंपरी येथील मुख्य केंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला.

जवानांनी आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवले. डीपी बॉक्‍सला आग लागल्यामुळे ऐन सुणासुदीच्या काळात काही वेळेसाठी मोरवाडी परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.