Vadgaon Maval : वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

वडगाव भाजप अध्यक्ष अनंता कुडे यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज – वडगाव शहर भाजपचे अध्यक्ष अनंता कुडे यांच्या वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्च टाळून वडगाव भाजपच्या वतीने कुडे यांनी ठाकरवस्ती येथील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संच आणि खाऊचे वाटप केले. वाढदिवसाच्या खर्चाला बगल देत राबविलेल्या या उपक्रमाबद्दल कुडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

PMRDA : ‘पीएमआरडीए’च्या घरांच्या वीजजोडणीसाठी भोसरीच्या महावितरण कार्यालयात मदत कक्ष सुरू

वडगांव शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अनंता कुडे यांच्या वाढदिवसा निमित्त अनाठायी खर्चाला बगल देत वडगांव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अध्यक्ष अनंता कुडे यांनी वडगांव मावळ येथील प्रभाग क्र15 येथील ठाकरवस्ती भागातील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संच आणि खाऊ वाटप करण्यात आले.

 

यावेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,ज्येष्ठ नेते सोमनाथ काळे, नगरसेवक प्रवीण चव्हाण,माजी नगरसेवक ॲड.विजय जाधव यांनी शुभेच्छा व्यक्त करत असताना अध्यक्ष अनंता कुडे यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

 

या प्रसंगी नगरसेवक रविंद्र म्हाळसकर,वडगांव शहर भाजपा कार्याध्यक्ष माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे, संघटन मंत्री किरण भिलारे,  माजी सरपंच नितीन कुडे,माजी सरपंच संभाजी म्हाळसकर, सरचिटणीस कल्पेश भोंडवे,सुनिल कुडे,सागर मराठे,प्रमोद नवघणे, मावळ फेस्टीवलचे संचालक महेंद्र म्हाळसकर,वडगांव शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, उपाध्यक्ष कुलदीप ढोरे,सोमनाथ पवार,शिक्षक वृंद चेतना ढोरे,पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शाळेच्या सुरुवातीला मिळालेल्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.