Vadgaon Maval : वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून केली विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बंडू घोजगे यांचा स्तुत्य उपक्रम

एमपीसी न्यूज – वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात आली. आंबळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन व मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बंडू घोजगे यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबळे येथील विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड, वही, पेन, पेन्सिल अशा शालेय साहित्याचे यानिमित्ताने वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात आंबळे गावचे सरपंच मोहन घोलप, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भांगरे,
ओमकार शंकर आंभोरे, दिप्तेश पानसरे, निखिल आंभोरे, सचिन वायकर, किरण वायकर, अभि आंभोरे,  अभिषेक आंभोरे,  मदन आंभोरे, ओमकार पांडुरंग आंभोरे, भाऊसाहेब शिवेकर, शाळेचे मुख्याध्यापक संदीप कांबळे, शिक्षक व कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
आंबळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन व मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बंडू घोजगे यांनी आपला वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरा केला.
याप्रसंगी विद्यार्थ्यींनींनी औक्षण करून अभिष्टचिंतन केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबळे येथील विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड, वही, पेन, पेन्सिल अशा शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. आयसीटीसी हया मान्यता प्राप्त प्रशिक्षणात प्राविण्य मिळविल्याबद्दल सुवर्णा गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत उंडे यांनी केले.  तर संदीप कांबळे यांनी शालेय कार्यास घोजगे यांच्या असलेल्या विविध सहकार्याबद्दल आभार मानले. अभिष्टचिंतन केले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रम झाला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.