Talegaon : स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संगणक तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन शिबीर

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी आणि (Talegaon) लोटस कॉम्पुटर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल संगणक तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमात लोटस कम्प्युटरचे संचालक व प्रकल्प प्रमुख रो संदीप मगर यांनी व्याख्यान दिले.

प्रास्ताविक रो सत्यजित खांडगे यांनी केले तसेच ज्ञान हे किती महत्त्वाचे आहे हे एका प्रात्यक्षिकामधून त्यांनी दाखवले.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष रो राहुल खळदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

दहावीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा या निर्णायक वळणावर करिअरच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन लाभावे याकरिता अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष रो संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले आहे असे सांगितले.

शालेय समितीच्या अध्यक्षा रो.रजनीगंधा खांडगे यांनी शाळेतील (Talegaon) मुलांना या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी सांगितले.

रो सेक्रेटरी सुनील खोल्लम यांनी देखील मुलांना अशा प्रकारचे कार्यक्रम जास्तीत जास्त घेणार असल्याचे सांगितले.
व्याख्याते रो संदीप मगर यांनी करियर सिलेक्शन कसे करावे विद्यार्थ्यांनी आपले व्हिजन कसे सेट करावे आणि संगणकाचे आजच्या युगातील महत्त्व याचे प्रभावी मार्गदर्शन केले.

तसेच तुम्ही जी शाखा निवडाल त्या शाखेला अनुरूप असे संगणकाचे ज्ञान मिळवणे गरजेचे आहे. सध्या संगणकामध्ये ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सेक्युरिटी, रोबोटिक्स, डिजिटल फ्रीलान्सिंग, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट, ॲनिमेशन यासारखे लेटेस्ट कोर्सेस अवेलेबल आहेत याची माहिती दिली.

PCMC : उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती; आमदार महेश लांडगे यांची माहिती

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका मोहिते यांनी केले. तर आभार मुख्याध्यापिका शमशाद शेख यांनी मानले.

सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रोटरी क्लबचे रो विन्सेंट सालेर,रो योगेश शिंदे तसेच रोटरी क्लबचे आदी मान्यवर व लोटस कम्प्युटरच्या मयुरी वाघ यांनी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.