Pune : डॉ.नारळीकर यांच्या पत्नी व ज्येष्ठ गणिततज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ गणिततज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे पुण्यात निधन ( Pune ) झाले आहे.

Maharashtra : अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेण्यात वावगं काहीच नाही- देवेंद्र फडणवीस

शास्त्रज्ञ व लेखिका अशी ओळख असणाऱ्या  डॉ. मंगला नारळीकर या 79 वर्षांच्या होत्या. त्यांचे पुण्यात राहत्या घरी आज सकाळी 5.30 च्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आज दुपारी 11.30 च्या दरम्यान वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

डॉ. मंगला नारळीकर यांना काही वर्षांपूर्वी स्तनाचा कर्करोग झाला. त्यावर उपचार घेऊन त्या बऱ्या झाल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला.

त्यावर उपचार सुरू होते. यातच त्यांचा मृत्यू झाला. डॉ. जयंत नारळीकर यांचा विवाह 1966 मध्ये मंगला (गणितज्ज्ञ) यांच्याशी झाला.

त्यांना गीता, गिरिजा व लीलावती अशा तीन कन्या आहेत.

डॉ. मंगला नारळीकर यांची अध्यापकीय कारकीर्द मोठी राहिली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च (मुंबई), केंब्रिज विद्यापीठात , मुंबई आणि पुणे विद्यापीठ (सध्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ) आदी नामवंत संस्थांमध्ये त्यांनी अध्यापन आणि संशोधनाची जबाबदारी पार पाडली आहे.

1974 ते 1980 या काळात त्यांनी प्राध्यापक के. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा इन्स्टिट्युटल येथे संशोधन करुन गणित विषयात पदवी मिळवली.

डॉ. मंगला नारळीकर यांनी अध्यापन, संशोधनासोबतच विविध विषयांवर पुस्तकेही लिहीली आहेत. त्यातील बहुतांश पुस्तके ही विज्ञानावर आधारीत आहेत.

याशिवाय त्यांनी विविध संशोधन करुन काही रिसर्च पेपरही प्रसिद्ध केले आहेत. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांच्या निधनामुळे राज्याच्या संशोधन आणि वैज्ञानिक अभ्यास करणाऱ्या वर्तुळाला मोठा धक्का मानला जात आहे. त्यांचे मार्गदर्शन अनेकांसाठी मोलाचे ( Pune ) राहिले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.