Talegaon Dabhade : संयम उपकरण वंदनावली उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील श्री जीरावला पार्श्वनाथ जैन मंदिर येथे चातुर्मासा निमित्त संयम उपकरण वंदनावली हा अध्यात्मिक कार्यक्रम घेण्यात (Talegaon Dabhade ) आला. यावेळी साधू, साध्वी, गुरु महाराज यांच्या विषयी कृतज्ञतेची भावना ठेवणे आणि वाढीस लावणे म्हणजेच संयम उपकरण वंदनावली असे प्रतिपादन गुरुदेव पियुष चंद्र विजय महाराज यांनी केले.

Pune : डॉ.नारळीकर यांच्या पत्नी व ज्येष्ठ गणिततज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे निधन

तळेगाव दाभाडे येथील जिरावाला जैन मंदिरामध्ये परोपकारी सम्राट आचार्य श्री ऋषभचंद्र सुरिश्वरजी महाराज यांच्या आज्ञेने शिष्य पंचम वर्षीतप तपस्वी मुनीराज पियुषचंद्र विजयजी महाराज, मुनिराज श्री रजतचंद्र विजयजी महाराज, मुनी श्री प्रितेशचंद्र विजयजी महाराज यांचा परमपथ चातुर्मास 2023 मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

रोज सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत चातूर्मासा निमित्त प्रवचन श्री जिरावला पार्श्वनाथ जैन मंदिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे.

भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिरावाला पार्श्वनाथ जैन मंदिराचे विश्वस्त यांनी केले आहे.

क्रिशा ऋषिक ओसवाल, गोरल अमृता शहा, अमृतलाल शेषमल ओसवाल, विकी ओसवाल, नियंत विजय सोलंकी, खुशी इंदरमल राठोड, गायत्री ओसवाल, मंचालालजी राठोड,

हजारीमलजी कपूरचंदजी धुमावत, खेताजी मुळाजी गुंदेशा, अशोक ओसवाल, विजय गदिया, पूरया प्रवीण जैन व क्रियांश गणेश राठोड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता (Talegaon Dabhade ) झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.