Hadapsar : हडपसरमध्ये पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज -पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीवर या महिलेच्या पतीने(Hadapsar) प्राणघातक हल्ला केला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ओम साई व्हिडिओ गेम अँड पोकर झोन, ससाणे नगर येथे 15 जुलै च्या रात्री हा प्रकार घडला.

हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : संयम उपकरण वंदनावली उत्साहात साजरी

अमोल संदिपान गायकवाड (वय 34) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्रकरणी सुशेण उर्फ सुशांत बाळासाहेब चव्हाण (वय 26) या तरुणाने तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपीची पत्नी फिर्यादी सोबत मागील दीड वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे.

हाच राग मनात धरून आरोपीने फिर्यादी हे त्यांच्या दुकानात असताना तोंडाला रुमाल बांधून आणि डोक्यावर टोपी घालून जात हातातील लोखंडी हत्याराने त्यांच्या डोक्यावर कानावर आणि हातावर वार केले.

यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास (Hadapsar) सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.