Chinchwad : डॉ.अरविंद ब. तेलंग इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये निरोप समारंभ

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे  डॉ.अरविंद ब. तेलंग इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये (Chinchwad ) बीएससीएचएस च्या (शै.वर्ष 2022-23) तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.

Hadapsar : हडपसरमध्ये पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यावर प्राणघातक हल्ला

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रॅडीसन ब्ल्यु हॉटेलचे  सरव्यवस्थापक पंकज सक्सेना आणि डॉ.अ.ब तेलंग हॉटेल मॅनेजमेंट प्राचार्य डॉ. अजय कुमार एम. राय आदी  उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने होवून डॉ. अजयकुमार राय यांनी प्रास्ताविक पर भाषण करून अतिथींचे स्वागत केले.

त्यानंतर प्रा. रणजीत पाटील यांनी उपस्थित अतिथींचा परिचय करून दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षातील उल्का कुलकर्णी व अथर्व पायगुडे  या विद्यार्थ्यांनी केले.

या कार्यक्रमामध्ये तृतीय वर्ष उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालायाच्या वतीने स्मृतिचिन्ह  सन्मानित करण्यात आले.

तर तीन वर्षाची संपूर्ण कामगिरी बघून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी  विश्वकर्मा सुरज राजेश  आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी  यादव वैष्णवी सुनील यांना सन्मानचिन्ह देण्यात आले.

शेवटी डॉ. अजयकुमार राय, प्राचार्य यांनी संस्थेचे कार्याध्यक्ष  वालचंद संचेती यांचे वेळोवेळी सहकार्य व बहुमुल्य मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगून आभार व्यक्त केले तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच संस्मरणीय निरोप समारंभ यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे हि आभार मानले.  प्रा. दीपक मोरे  यांनी आभार(Chinchwad ) प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.