Nigdi : निगडीतील भगवान पार्श्वनाथ जप अनुष्ठान कार्यक्रमात 1008 जोडप्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज – श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ ( निगडी- प्राधिकरण) यांच्या (Nigdi) वतीने रविवारी (दि. 16) कविरत्न उपाध्याय प्रवर केवलमुनीजी म. सा. यांच्या जन्म जयंतीनिमित्त भगवान पार्श्वनाथ जप अनुष्ठानचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 1008 जोडप्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे अवघे वातावरण भक्तीमय झाले होते.

Chinchwad : डॉ.अरविंद ब. तेलंग इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये निरोप समारंभ

निगडी प्राधिकरण येथील पाटीदार भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला मोठ्या संख्येने जैन भाविक उपस्थित होते.

दक्षिण चंद्रिका साध्वी डॉ. संयमलता म. सा., साध्वी डॉ. अमितप्रज्ञाज 3 म. सा., साध्वी कमलप्रज्ञाजी म.सा., साध्वी सौरभप्रज्ञा म.सा. यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम झाला.

साध्वी अमितप्रज्ञाजी म.सा. यांना पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल त्यांना शाल अर्पण करण्यात आली.

निगडी-प्राधिकरण श्रावक संघाचे अध्यक्ष अध्यक्ष नितीन बेदमुथ्था,  चातुर्मास कमिटी अध्यक्ष मनोहर लोढा, स्वागताध्यक्ष राजेंद्र मुनोत, कार्याध्यक्ष मनोज सोळंकी, संतोष गुगळे, संजय खाबिया, अनुप मुनोत, सुभाष ओसवाल, कांतीलाल शिंगी, मनोज ओस्तवाल, अशोक नहार, विजय मालू, सुभाष बेदमुथ्था, श्रेणिक मंडलेचा आदी उपस्थित होते.

याप्रसंगी राजू पारेख (शहा) यांच्या सौजन्याने ‘आयुर्वेद आणि घरगुती उपचार’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

निकिता कटारिया-गांधी यांनी तीर्थंकर प्रभूविषयी साधू-साध्वी यांची भक्ती या विषयावर काढलेल्या चित्राच्या लावण्यात आलेल्या बोलीतून मिळालेली दानराशी गौतमनिधीच्या सामाजिक कार्यासाठी देण्यात आली.

संतोष चंगेडिया यांनी हे चित्र घेतले.

युवा मंडलचे अध्यक्ष पवन लोढा, मयूर सोळंकी, सौरभ बेदमुथ्था, सुभाष ओस्तवाल, अनुप मुनोत, संजय खाबिया, सचिन पितळे निलेश नहार यांनी संयोजन (Nigdi) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.