Maharashtra : अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेण्यात वावगं काहीच नाही- देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेण्यात वावगं काहीच नाही , असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं (Maharashtra) आहे. काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या अन्य मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली .राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार त्यांच्यासोबत असलेल्या आमदार, मंत्री आणि नेत्यांना घेऊन शरद पवारांच्या भेटीला अचानकपणे भेटायला गेल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले.त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली .

Pune : सहकारनगर हद्दीत पुन्हा तोडफोड; सर्वसामान्यांची सहा वाहने फोडली

काल ( दि.16 ) उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मराव बाबा आत्राम, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले होते.

अचानकपणे अजित पवार गट शरद पवारांना भेटायला गेल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले होते.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली . ते म्हणाले,’ही भेट झाल्याची मला कल्पना नाही, पण भेट घेतली तर त्यात काही वावगं आहे, असं मला वाटत नाही.

वर्षानुवर्ष शरद पवार साहेब त्यांचे नेते आहेत.

नवीन काही राजकीय समीकरण होईल, असं मला वाटत नाही.’

तसेच या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले.आमचे सर्वांचे दैवत, आमचे नेते, आदरणीय शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. वेळ न मागता आम्ही गेलो.

शरद पवार हे चव्हाण सेंटरला मिटिंग निमित्त आल्याचं कळालं होतं. त्यामुळे संधी साधून आम्ही  गेलो.

पवार साहेबांच्या पाया पडून आशीर्वाद मागितले. सोबत आम्ही सर्वांनी साहेबांना विनंती केली की, आमच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच.

राष्ट्रवादी एकसंघ कसा राहू शकतो यासाठी त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे.

यावर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आमचं मत शांतपणे ऐकून घेतलं, असे त्यांनी (Maharashtra)  सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.