Pune : सहकारनगर हद्दीत पुन्हा तोडफोड; सर्वसामान्यांची सहा वाहने फोडली

एमपीसी न्यूज -सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांकडून पुन्हा (Pune)  एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली. धनकवडी येथील चव्हाण नगर मधील शांतीनगर येथे रविवारी सायंकाळी टोळक्याने तोडफोड केली.

PCMC :  25 हजारांपुढील थकबाकीदारांना  7 दिवसांचा अल्टीमेटम…

या टोळक्याने चार चार चाकी एक रिक्षा आणि एक दुचाकी अशा सहा वाहनांची तोडफोड केली.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शांतीनगर वसाहत परिसरात सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या काही अल्पवयीन तरुणांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या वाहनांवर लाकडी दांडके आणि दगड मारले.

यामध्ये वाहनांच्या काचा फुटले आहेत. आरोपींनी सात ते आठ गाड्या फोडल्या.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तब्बल 26 गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती.

त्यानंतर पोलिसांनी यातील आरोपींना अटक करून मोका देखील लावला.

मात्र तरी देखील सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तोडफोड काही थांबताना दिसत (Pune)  नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.