Pimpri : एक दिवसाच्या ड्राव्हरने केली दोन लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – एक दिवसासाठी ड्राव्हर म्हणून काम दिलेल्या इसमाने गाडीच्या ड्रॉवर मधून दोन लाख रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार 18 जुलै रोजी दुपारी साडेचार ते सव्वापाचच्या सुमारास माणिकबाग, ऑर्चिड पार्किंग, पिंपरी येथे घडला.

शाम शिवाण्णा शेट्टी (वय 57, रा. आशा इस्टेट, श्रीनगर वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जेसुपांडी चेल्लादुराई नाडार (वय 48, रा. विजयनगर झोपडपट्टी, जवाहरलाल नेहरू मार्ग, पश्चिम मुंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेट्टी हे व्यावसायिक आहेत. ते 18 जुलै रोजी व्यावसायिक कामानिमित्त पिंपरी उद्यमनगर मधील माणिकबाग ऑर्चिड येथे आले होते. त्यावेळी त्यांचा नेहमीच ड्राव्हर गैरहजर होता. त्यामुळे शेट्टी यांनी त्यांच्यासोबत एक दिवसासाठी जेसुपांडी याला ड्राव्हर म्हणून आणले होते. जेसुपांडी त्यांच्या तोंडओळखीचा होता. दुपारी साडेचारच्या सुमारास ते माणिकबाग ऑर्चिड इमारतीच्या पार्किंगमध्ये कार लावून इमरातीमध्ये कामासाठी गेले. त्यावेळी कारमध्ये जेसुपांडी एकटाच होता. त्याने कारच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. शेट्टी खाली आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.