Battle of Palkhed : अनुभवा पालखेडची जगप्रसिद्ध लढाई

एमपीसी न्यूज : मातृमंदिर विश्वस्त संस्था (Matrumandir vishwast sanstha) व ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र (Dnyanprabodhini Nigdi Kendra) यांच्या संयुक्त विद्यमाने जगप्रसिद्ध पालखेडची लढाई (Battle of Palkhed) वेगळ्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे.
पाठ्यपुस्तकी इतिहास मुलांना कधीच आवडत नाही, हे लक्षात घेऊन वेगळ्या माध्यमातून या प्रदर्शनाची निर्मिती केली आहे. सुमारे 20 मिनिटांच्या दृकश्राव्य चित्रफितीला सुमारे 200 चौरस फुटातील युद्धभूमीची व एलईडी दिव्यांची जोड दिली आहे. त्यातून पेशवा बाजीराव यांची युद्धनीती दाखवण्यात आली आहे. पेशवा बाजीराव हे अजिंक्य योद्धा म्हणून ओळखले जातात. बाजीराव व निजाम उल मुल्क (Battle between Bajirao peshwa and Nizam ul mulk) यांच्यातील संघर्षाची ही गाथा आहे.

Mahavitaran : महावितरण प्रादेशिक नाट्य स्पर्धेचे थाटात उद्घाटन; ‘इस्किलार’, ‘ब्लाइंड गेम’ नाट्यकृतींनी रसिक मंत्रमुग्ध

इतिहास तज्ञ मोहन शेटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन तयार करण्यात आले आहे. रघुराज एरंडे व  ऋषिकेश परदेशी यांनी प्रतिकृती तयार करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. इतिहास अभिरुची गटाचे आजी-माजी विद्यार्थी प्रदर्शनाची सर्व व्यवस्था बघत आहेत. सर्वांनीच विशेषत: शालेय विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास (Battle of Palkhed) आवर्जून भेट द्यावी असे आवाहन संस्थेचे कोषाध्यक्ष शिवराज पिंपुडे यांनी केले.

हे प्रदर्शन दिनांक 16 नोव्हेंबर पर्यंत सर्वांसाठी निशुल्क स्वरूपात खुले आहे. प्रदर्शनाचे ठिकाण ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय असून ते संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.