Mahavitaran : महावितरण प्रादेशिक नाट्य स्पर्धेचे थाटात उद्घाटन; ‘इस्किलार’, ‘ब्लाइंड गेम’ नाट्यकृतींनी रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज – महावितरणच्या पुणे परिमंडलाद्वारे ( Mahavitaran) आयोजित पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेला आज थाटात सुरुवात झाली. पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात या स्पर्धा होत आहेत.

स्पर्धेची सुरुवात नटराजपूजन व दीप प्रज्वलनाने झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंते सचिन तालेवार (पुणे), सुनील पावडे (बारामती), परेश भागवत (कोल्हापूर) तसेच नाट्य परीक्षक संजय गोसावी, अरुण पटवर्धन व मंजुषा जोशी यांची उपस्थिती होती. ‘महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी या नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कर्मचारी, त्यांच्या कुटुंबियांनी व नाट्यप्रेमींनी आनंद घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी यावेळी केले.

कोल्हापूर परिमंडलाच्या ‘इस्किलार’ या जी. ए. कुलकर्णी लिखीत कथेवरील नाट्य रूपांतराच्या पहिल्या प्रयोगाने स्पर्धेला सुरुवात झाली. या नाटकातून एका शापित राजकुमाराच्या माध्यमातून नियतीचा खेळ मांडला आहे. त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या शोध प्रवासात त्याला विविध व्यक्तिरेखा भेटतात. त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखेचा जीवनाकडे बघण्याचा एक स्वतंत्र दृष्टीकोन, मांडलेलं तत्वज्ञानाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

Life Certificate : हयातीचा दाखला सादर करण्याचे निवृत्तीवेतन धारकांना आवाहन

दुपारच्या सत्रात बारामती परिमंडलाने रत्नाकर मतकरी (Mahavitaran) लिखित ‘ब्लाइंड गेम’ या दोन अंकी नाटकाचे दमदार सादरीकरण केले. एका अंध महिलेच्या जिवनातील जगण्याचा संघर्ष मांडण्याचा त्यांनी प्रभावी प्रयत्न केला. या नाटकाने शेवटच्या क्षणापर्यंत ‘सस्पेंन्स’ कायम ठेवत रसिकांना गुंतून ठेवले.

यावेळी अधीक्षक अभियंते राजेंद्र पवार, प्रकाश राऊत, सतीश राजदीप, अंकुर कावळे व गौतम गायकवाड, उपमहाव्यवस्थापक अभय चौधरी, सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर, पांडुरंग वेळापुरे, माधुरी राऊत, किर्ती भोसले, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, भुपेंद्र वाघमारे व श्रीकृष्ण वायदंडे यांचेसह पुणे शहरातील सर्व अभियंते व कर्मचारी, पुणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.