Today’s Horoscope 8 November 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 8 November 2022
वार – मंगळवार.
08.11.2022
शुभाशुभ विचार- ग्रहणदिन.
आज विशेष- गुरुनानक जयंती.
राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – भरणी.
चंद्र राशी – मेष.

—————————————-
मेष – ( शुभ रंग- पिस्ता )
आज तुमचा लहरी व संशयी स्वभाव काबूत ठेवा. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याची भान ठेवा.

वृषभ (शुभ रंग- आकाशी )
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका, कदाचित आज एखादा असा मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. एखादी चीज वस्तू गाळ होईल सतर्क रहा.

मिथुन ( शुभ रंग- भगवा )
आज कार्यक्षेत्रातील काही मनाजोगत्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र सावध राहा. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.

कर्क (शुभ रंग- मोतिया.)
नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकार योग चालून येतील. वडील आज योग्य सल्ले देतील. तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. कर्तव्यास प्राधान्य द्या.

सिंह (शुभ रंग- मोरपिशी )
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. आज तुम्हाला हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल. आज झटपट लाभाचा मोह टाळा. स्वतःवर संयम असू द्या.

कन्या ( शुभ रंग- निळा)
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावर ढकला. ज्येष्ठांची पाऊले संध्याकाळी सत्संगाकडे आपोआपच वळतील.

तूळ ( शुभ रंग- डाळिंबी) Today’s Horoscope 7 November 2022
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करायला हवेत भागीदारीत देणे घेण्याचे व्यवहार चोख ठेवा.

वृश्चिक (शुभ रंग- राखाडी)
नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. कामाचे तास मात्र वाढवावे लागणार आहेत. आज तब्येत थोडी नरमच असेल. पती-पत्नी मधे मतभेद असतील तर सुसंवादाने मिटतील.

धनु- (शुभ रंग- पंढरा)
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ राहील. स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.

मकर ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून देता येतील. स्थावराचे व्यवहार लाभ मिळवून देतील. आज मातोश्रीचे सल्ले महत्वपूर्ण असतील.

कुंभ (शुभ रंग – लाल)
आज जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी येतील. केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणे महत्त्वाचे राहील. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

मीन -(शुभ रंग – सोनेरी )
धंद्यात आज येणीअपेक्षित पणे वसूल होतील. गोड बोलून आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपलेसे कराल. आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च थांबवायला हवा

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.