Mahavitaran : महावितरणच्या स्नेहमेळाव्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांची कौटुंबिक धमाल, आपुलकी अन् हास्यांतून नवऊर्जा

एमपीसी न्यूज – एरवी ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, (Mahavitaran) थकीत वीजबिल वसूली व कार्यालयीन कामात व्यस्त असणाऱ्या महावितरणच्या पुणे परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरूवारी (दि. 7) कौटुंबिक धमाल केली. लहान मुले, महिला व पुरुषांच्या गटातील विविध खेळ, महिलांसाठी खास होम मिनिस्टर स्पर्धा आदींमुळे कामाचा ताण विसरून अधिकारी व कर्मचारी यांच्यात आपुलकीची चर्चा, हास्यविनोदाने कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात साजरा झाला.

गणेशखिंड येथील महावितरणच्या विश्रामगृह परिसरात गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे व जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार (पुणे), सुनील पावडे (बारामती), अनिल कोलप (महापारेषण) व महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक पंकज तगलपल्लेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात पुणे परिमंडलातील अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसह सुमारे 1600 आबालवृद्ध सहभागी झाले होते.

स्नेहमेळाव्यातील जत्रासदृश उत्साही वातावरणात पुरुष व महिलांच्या गटात संगीत खुर्चीचा खेळ रंगला. टॅट्यू, मेंदी, महिला दिन व सुरक्षा दूताचे सेल्फी पॉईंट व इतर खेळांचा आनंद लुटला. सोबत विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती. महावितरणचे  दिलीप गायकवाड यांच्या सुरेल विविध गाण्यांनी रंग भरला. तसेच सुमारे 90 महिलांच्या सहभागामुळे तब्बल दोन तास चाललेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत भोसरी विभागाच्या सहायक अभियंता ज्योत्स्ना बोरकर यांनी विजेत्या म्हणून मानाची पैठणी जिंकली. तर विनिता दाणे यांनी द्वितीय व विजय गोसावी यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

Thergaon : युवा सेनेच्या वतीने क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या महिलांचा सन्मान

या कार्यक्रमाचे कपिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पुणे-बारामती परिमंडल संघाने सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले. त्यानिमित्त खेळाडू व संघ व्यवस्थापकांचा या मेळाव्यात पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच (Mahavitaran) जागतिक महिला दिनानिमित्त प्रादेशिक संचाल अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार व सुनील पावडे यांनी मनोगत व्यक्त करीत महिलाशक्तीचा गौरव केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी केले व आभार मानले.या स्नेहमेळाव्यात अधीक्षक अभियंता सर्वश्री अरविंद बुलबुले, युवराज जरग, प्रकाश राऊत, पुनम रोकडे, महाव्यवस्थापक (वित्त) माधुरी राऊत, उपमहाव्यवस्थापक (मासं) सुशील पावसकर, सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर (पुणे), श्रीकृष्ण वायदंडे (बारामती) यांच्यासह अभियंता, अधिकारी, कर्मचारी कुटुंबियांसह सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.