Pune : देणगीदारांची यादी सर्वोच्च न्यायालयास न दिल्यास सत्याग्रह आंदोलने करणार; गोपाळ तिवारी यांचा इशारा

एमपीसी न्यूज – सर्वोच्च न्यायालयाने, देशाची लिडींग राष्ट्रीयकृत बँक (Pune) अशी ख्याती व विश्वसनियता असणाऱ्या “स्टेट बँक ॲाफ इंडीया” (SBI)ला “ईलेक्शन बाँड” माध्यमातून कुणाचा किती पैसा? मोदी-शहांच्या “विकसित भाजपच्या खात्यात” आला याची विचारणा करून, पुरेशी मुदत देऊन माहिती देण्यास सांगितले होते. मात्र, बँकींग स्वायत्तता असलेली ‘एसबीआय’ सारखी लिडींग राष्ट्रीयकृत बँक सदरची यादी उपलब्ध  असूनही सर्वोच्च न्यायालयात देण्यास टाळाटाळ करत असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येत आहे. देणगीदारांची यादी’ सर्वोच्च न्यायालयास न दिल्यास सत्याग्रह आंदोलने करण्यात येणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिला आहे.

Mahavitaran : महावितरणच्या स्नेहमेळाव्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांची कौटुंबिक धमाल, आपुलकी अन् हास्यांतून नवऊर्जा

बाहेरील ‘राष्ट्रविरोधी शक्तींचा पैसा’ या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून आला आहे काय? हे तपासणे व जनतेस कळणे हे तितकेच गरजेचे व महत्वाचे आहे. सर्वोच्च न्यायालयास माहीती देण्याविषयी टाळाटाळ वा दिरंगाई करणे हे बँकेचे कृत्य असंवैधानिक (Pune) व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारे आहे. एसबीआयची भुमिका कोणा राजकीय पक्षाच्या फेवरमध्ये असून देशद्रोहाची आहे काय? असा परखड सवालही काँग्रेसने केला आहे.

देशातील राष्ट्रीयकृत बँकांचे नेतृत्व करणाऱ्या ‘स्टेट बँक ॲाफ इंडीया’ने आपली विश्वसनियता जपावी व संविधानिक ऊत्तरदायीत्व निभावावे, अन्यथा देशातील कोट्यावधीं जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो, याची गंभीर जाणीव ठेवावी, असे आवाहन गोपाळ तिवारी यांनी केले आहे.

‘एसबीआय’ने ही माहिती सर्वोच्च न्यायालयास मुदतीत दिली नाही तर राज्यभर काँग्रेस कार्यकर्ते  सत्त्याग्रह आंदोलने करतील, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिल्याचे प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.