Pune : महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत पुणे-बारामती संघाला सर्वसाधारण अजिंक्यपद तब्बल 16 सुवर्ण तर 20 रौप्यपदकांची केली कमाई

एमपीसी न्यूज – छत्रपती संभाजीनगर (Pune) येथे आयोजित महावितरणच्या २०२३-२४च्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत पुणे-बारामती परिमंडल संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत सलग दुसऱ्या वर्षी सर्वसाधारण अजिंक्यपदाचा मान पटकावला. तर कोल्हापूर परिमंडलाने उपविजेतेपद मिळविले. पुणे-बारामती परिमंडल संघातील खेळाडूंनी वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारात नेत्रदिपक कामगिरी करीत या स्पर्धेत तब्बल १६ सुवर्ण तर २० रौप्यपदकांची कमाई केली.

छत्रपती संभाजीनगर येथे दि. १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेचा पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अशोका सभागृहात रविवारी (दि. ४) सायंकाळी समारोप झाला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, संचालक (मानव संसाधन), अरविंद भादीकर, पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, मुख्य अभियंता परेश भागवत, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार व सहकाऱ्यांनी अजिंक्यपदाचा करंडक स्वीकारला.

महावितरणच्या १६ परिमंडलांच्या ८ संयुक्त संघातील सुमारे १२०० खेळाडूंचा समावेश असलेल्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनात तसेच मुख्य अभियंता राजेंद्र पवार (पुणे) व सुनील पावडे (बारामती) यांच्या नेतृत्वात पुणे-बारामती परिमंडल संघाने यंदा क्रीडा स्पर्धेसाठी कसून तयारी करण्यात आली. खेळाडूंना प्रशिक्षण देणे, सराव शिबिर आदींचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडास्पर्धेचे समन्वयक तसेच उपमुख्य औद्योगिक अधिकारी शिरीष काटकर (पुणे) व श्रीकृष्ण वायदंडे (बारामती) यांनी खेळाडूंची निवड चाचणी, सराव, प्रशिक्षण शिबिर आदींसाठी महत्वाचे योगदान दिले.

पुणे-बारामती परिमंडल संघाने सांघिक खेळात (Pune) व्हॉलिबॉल, खोखो (पुरुष) व टेनिक्वाईट (महिला) स्पर्धेत विजेतेपद मिळविले तर कबड्डी (महिला), टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम (पुरुष) आणि बॅटमिंटन (महिला) मध्ये उपविजेता ठरले.

Pune: पार्थ एनक्लेव्ह सोसायटीच्या ‘ई’ विंगमध्ये सौर पॅनलद्वारे वीज निर्मितीच्या प्रकल्पाचे उद्घाटन 

वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये पुणे-बारामती संघाचे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे- धावणे १०० मीटर (पुरुष)- गुलाबसिंग वसावे (उपविजेता), २०० मीटर (पुरुष)- गुलाबसिंग वसावे (विजेता), २०० मीटर (महिला)- माया येलवंडे (उपविजेता), ४०० मीटर (पुरुष)- गुलाबसिंग वसावे (विजेता), ४०० मीटर (महिला)- भक्ती लोमटे (उपविजेता), ८०० मीटर (पुरुष)- प्रतिक वाईकर (विजेता), १५०० मीटर (महिला)- अर्चना भोंग (उपविजेता), ५००० मीटर (पुरुष)- प्रतिक वाईकर (उपविजेता), ४ बाय १०० रिले (पुरुष) – गुलाबसिंग वसावे, प्रतिक वाईकर, अक्षय केंगळे, सोमनाथ कंठीकर (विजेते), गोळा फेक (पुरुष)- प्रवीण बोरावके (विजेता), थाळी फेक (पुरुष)- अक्षय केंगळे (उपविजेता), थाळी फेक (महिला)- हिना कुरणे (विजेता), भाला फेक (पुरुष)- अक्षय केंगळे (उपविजेता), लांब उडी- पुरुष गट- अक्षय केंगळे (उपविजेता), महिला गट- माया येळवंडे (उपविजेता), कॅरम (पुरुष)- संजय कांबळे (उपविजेता) टेनिक्वाईट- (महिला एकेरी)- अमृता गुरव (उपविजेता), (महिला दुहेरी)- शीतल नाईक, कोमल सुरवसे (विजेते), टेबल टेनिस– पुरुष एकेरी– अतुल दंडवते (विजेता), पुरुष दुहेरी- अतुल दंडवते व दीपर रोटे (विजेता), बॅडमिंटन- पुरुष एकेरी- भरत वशिष्ठ (विजेता), पुरुष दुहेरी – भरत वशिष्ठ व सुरेश जाधव (उपविजेता), महिला एकेरी- वैष्णवी गांगरकर (उपविजेता), महिला दुहेरी- वैष्णवी गांगरकर व कमल दारूखानवाला (उपविजेता), कुस्ती – ६५ किलो- राजकुमार काळे (विजेता), ७४ किलो- चंद्रकांत दरेकर (उपविजेता), ९२ किलो- अमोल गवळी (विजेता), ९७ किलो- महेश कोळी (विजेता).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.