Dehu : जाब विचारला म्हणून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – चुलत भावाच्या गाडीला कट का मारला (Dehu) याचा जाब विचारला म्हणून तरुणाला कोयत्याने व लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.3) देहुगाव येथे घडली.

याप्रकरणी धीरज गुलाब टिळेकर (वय 28 रा. देहुगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अभिजीत ऊर्फ मोन्या विलास टिळेकर, प्रतिक ऊर्फ सोन्या विलास टिळेकर ( रा. देहुगावं) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत पुणे-बारामती संघाला सर्वसाधारण अजिंक्यपद तब्बल 16 सुवर्ण तर 20 रौप्यपदकांची केली कमाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांना फिर्यादी ने गाडीला कट मारल्याचा जाब विचारला म्हणून चिडून जावून फिर्यदीला शिवीगाळ करत डोक्यात जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयता मारला. यावेळी फिर्यादीनुसार चुलत भावाच्या पाठीत रॉड ने मारहाण केली. या वरून देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तापस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.